‘त्या’ अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

‘त्या’ अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; कारण अद्याप अस्पष्ट
सोलापूरातील केगाव येथील एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.
सानिका ज्ञानेश्वर भोसले( वय वर्ष सात, राहणार- केगाव सोलापूर) असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. सानिका ही आई सोबत टेंभुर्णी येथील आजोळी राहत होती. सानिका हिचे वडील ती लहान असतानाच मरण पावल्यामुळे तिची आई तिला घेऊन टेंभुर्णी येथील माहेरी राहत होती.
गुरुवारी दुपारी सानिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी केगाव येथील मूळगावी तिचा मृतदेह आणण्यात आला होता. केगाव येथील राहत्या घरी तिच्या शरीरावर जखमा दिसून आल्या. त्यामुळे सानिकाच्या आजीला संशय आला. आजीने हा प्रकार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कळवला. घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
रुग्णवाहिकेतून सानिकचा मृतदेह शासकीय रुग्णालयांमध्ये आणण्यात आला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
सानिका भोसले हिच्या गुडघ्याला, पोटाला व हाताच्या कोपऱ्याला खरटचलेल्या जखमा झालेल्या आहेत. मात्र नेमका तिचा मृत्यू कशामुळे झाला हे सध्या तरी कळत नाही.


प्रथमदर्शनी तरी अंगावर असलेल्या जखमांमुळे नेमका मृत्यु कशामुळे झाला. हे जरी समजत नसले तरी शवविच्छेदन केल्यानंतर नेमके कारण कळेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सानिका भोसले हिला दोन वर्षापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता त्यामुळे तिला रेबीज झाले होते. अशी शंका घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी व्यक्त केली.आज शुक्रवारी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.