जीवाशी खेळ नको, यामध्ये राजकारण आणू नका असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण घोषणा केली
अमेरिका आणि ब्राझील मध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे.
हंगेरी, डेन्मार्क ,ग्रीस ,बेल्जियम, पोर्तुगल,केनिया, युके, या ठिकाणी सुद्धा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे.
एका बाजूला अर्थचक्र तर एका बाजूला अनर्थ या चक्रव्युह मध्ये आपण अडकलो आहोत.
लॉकडाऊनच्या विरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला
जीव वाचवायचा की रोजगार वाचवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येत्या एक ते दोन दिवसांमध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून तसेच काही तज्ञ मंडळींशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
अशीच रुग्ण संख्या वाढत राहिली तर येत्या पंधरा ते वीस दिवसात हॉस्पिटल तुडुंब भरून जातील असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून सांगितले.
येत्या एक ते दोन दिवसात नियमावली जाहीर करणार असून राज्यात कडक निर्बंध लावणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय पण आज लॉकडाऊन लावणार नाही असेही त्यांनी सांगितले
Leave a Reply