आज दि.16 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1129 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी 17 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.
आज शुक्रवारी 16 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1129 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 672 पुरुष तर 457 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 562 आहे. यामध्ये 372 पुरुष तर 192 महिलांचा समावेश होतो. आज 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 8993 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7864 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.