Big 9 News Network
शहर परिसरात लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे,त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी आणि कोरोना रोखण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत नगरसेवक आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive) यांचे सो.म.पा आयुक्त यांना निवेदन दिले.
कोरोना (Corona) महामारीची दुसरी लाट तीव्र पद्धतीने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सध्या पसरलेले आहे, सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लसीकरण करण्याचे काम सुरू असून त्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
अधिक प्रमाणात लसीकरण केंद्र निर्माण झाल्यास सोशल डिस्टंसिंग व covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जादा लसीकरण केंद्र निर्माण करणे गरजेचे असून लवकरात लवकर लसीकरण केंद्र वाढवण्यास संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावे अशा प्रकारचे निवेदन नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांना दिले.
शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर लसीकरण केंद्र वाढवावे. जेणेकरून रेड झोन मधील सोलापूर ग्रीन झोन मध्ये रूपांतरित होईल