मोहोळ | 14 वर्षीय मुलीचा बालविवाह; आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल

Big9news Network

बालविवाह हा एक मोठा गुन्हा असूनही मोहोळमध्ये एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखुन ही पुन्हा करण्यात आला. तर झाले असे कीत्या अल्पवयीन मुलीचा दीड वर्षापूर्वी होत असलेला बालविवाह रोखण्यात आला होता. संबंधित नातेवाइकांवर गुन्हा दाखल करून समज देऊन सोडून दिल्यानंतरही पुन्हा त्याच मुलीचा गुपचूप बालविवाह करून ती मुलगी सात महिन्यांची गरोदर आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा बाल विकास कार्यालयामार्फत चौकशी करून संबंधित पतीसह अन्य तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावात १६ जून २०२० रोजी नजीक पिंपरी येथील सागर मेटकरी या मुलाचा विवाह एका १४ वर्षांच्या मुलीबरोबर होत असल्याची तक्रार जिल्हा बाल विकास अधिकारी अतुल वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्या पथकाने भेट देत तो बालविवाह रोखला होता. त्या दिवशी संबंधित सागर मेटकरी व त्याच्या नातेवाइकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचे समुपदेशन करून त्यांना सोडून देण्यात आले होते.

दरम्यान, पुन्हा सागर मेटकरी याचा विवाह त्याच मुलीशी गुपचूप लावून देण्यात आला होता. ती पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याची निनावी तक्रार जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर अतुल वाघमारे यांच्या पथकाने त्या गावाला भेट देऊन त्या मुलीचा पुन्हा विवाह झाला असून, ती मुलगी गरोदर झाल्याचे निदर्शनास आले असे कळताच.

ज्या दवाखान्यामध्ये तिने उपचार घेतले. तेथील सोनोग्राफी केलेले सर्व रिपोर्ट जमा करून मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये सागर मेटकरी, त्याची आई संगीता मेटकरी, पीडित मुलीचे आई-वडील या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.