Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत ग्रीन्स अपार्टमेंट, मडकी वस्ती येथील नागरिक ड्रेनेज, लाईट व रस्ते आदी समस्याचा सामना मागील अनेक वर्षापासून करीत आहेत. परिसरांतील ड्रेनेज वारंवार तुंबल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असुन नागरिकांना रस्त्यावरून जाणे सुद्धा कठीण झाले आहे. ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे एक प्रकारे रोगाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

या समस्येबाबत रहिवाशांनी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना सदरच्या समस्याबाबत भेटुन सांगितल्यामुळे नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन आनंद चंदनशिवे यांनी नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योतीताई बमगोंडे यांच्या समवेत महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या समवेत परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. तसेच एक महिन्याच्या कालावधीत परिसरातील नागरिकांच्या समस्या दूर होण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी असे सूचित केले.

याप्रसंगी महानगरपालिकेचे उप अभियंता अतुल भालेराव, एम. एच. बक्षी, राहुल गदवालकर, आर. व्ही. म्हेत्रे आदींना काम वेळेत पुर्ण करुन नागरिकांच्या समस्या त्वरीत सोडविण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी विजय बमगोंडे, अॅड. सुनिल कांबळे, ज्ञानेश्वर सुपेकर, सुधीर चंदनशिवे, राजेंद्र आळ्ळे, अनिल घाडगे आदींसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *