दावल मलिक दर्गा तलावात तिघांचा बुडून मृत्यू
——————————————–
सोलापूर, (प्रतिनिधी):- दक्षिण सोलापूर तालु्नयातील बोरामणी परिसरात असलेल्या दावल मलिक दर्गा येथील तलावात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवार दि. 7 ऑगस्ट रोजी घडली.
रिदाना तौफिक शेख (वय 35), यासीन हारून शेख (वय 35), मोहम्मद हारून सलीम शेख (वय 41, सर्व रा. कुंभारी नवीन विडी घरकुल, ता. दक्षिण सोलापूर) असे मृतांची नावे आहेत. हे तिघेजण देवकार्यासाठी बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे गेले होते देवकार्य संपवून परत येत असताना ते दुपारी जवळच असलेल्या तलावात गेले तेथे पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण पाण्यात बुडाले. जवळच्या लोकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले असता ते बेशुध्दावस्थेत होते याबाबत सोलापूर तालुका पोलीसांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक अरूण फुगे आणि त्यांचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीचा पंचनामा केला आणि तिघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापुर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉ्नटरांनी सांगितले. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.