Big 9 News Network
सतीश नावाडे यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
सेलू,दि.१५ : येथील नूतन विद्यालयातील क्रीडा शिक्षक
सतीश नावाडे यांची नाशिक येथील क्रीडा संस्कृती फाऊंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२०-२१ साठी निवड झाली करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दरवर्षी क्रीडा संस्कृती फाऊंडेशन नाशिकतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
श्री नावाडे यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत पत्राद्वारे सरचिटणीस उदय खरे यांनी कळविले आहे.
२९ ऑगस्ट २०२१ रोजी महेश भवन, अंबड पोलीस स्टेशन मागे सिडको, नाशिक येथे दुपारी ३.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराबद्दल श्री.नावाडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.