Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सध्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅप द्वारे मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे अशीच एक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे.

ग्राहकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या आन्टीला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. सुप्रिया बालीगा (वय ५३, रा. जुळे सोलापूर) असे आन्टीचे नाव आहे. तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. जुळे सोलापूर परिसर हा उच्चभ्रू परिसर आहे. या आधी सुद्धा या भागातून छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.

‘सुप्रिया’ ऑंटी नावाने प्रसिद्ध असून मागील अनेक वर्षांपासून परराज्यातून महिलांना बोलून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलीस तिच्या मागावर होते.

सतत बदलत असे मोबाईल नंबर –

पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ऑंटी वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर करत होती. प्रत्येक वेळी काही महिन्यानंतर मोबाईल नंबर बदलत असल्यामुळे पोलिसांच्या तावडीतून ती सुटत होती.

असा असायचा हनी ट्रॅप –

ऑंटी ही एका ग्राहकांच्या मोबाईलवर महिलांचे फोटो आणि रेट पाठवत होती. पोलिसांना याची माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले. वेळ ठरली ,रेट ठरला.. बनावट ग्राहकाने दीड हजार रुपये दिल्यानंतर ‘ऑंटी’ने ग्राहकासोबत एका महिलेला पाठवून दिले. त्यानंतर पोलिसांनी धाडी घालत ‘सुप्रिया’ वर कारवाई केली दरम्यान, तिच्या तावडीत असलेल्या मुंबई आणि सोलापूरच्या महिलेची सुटका करण्यात आली आहे.

कसे पकडले –

गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे सपोनि इंद्रजीत वर्धन यांना जुळे सोलापुरातील वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ पंच बोलून पंचांसमक्ष धाड टाकली. यात सुप्रिया बालिगा हिला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सपोनि इंद्रजित वर्धन, पीएसआय गंपले, वाघ, अफरोज शेख, सुभाष गायकवाड, डिगोळे आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *