Month: June 2021
-

जिल्ह्यातील 134 बालकांना संगोपन योजनेचा लाभ
Big9news Network कोविडमुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 134 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विजय खोमणे यांनी दिली आहे. कोविड साथीत पालक गमावलेल्या बालकांचे योग्यरित्या संगोपन आणि देखभाल केली जावी यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृतीदल स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली…
-

रेमडेसिवीर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार
Big9news Network शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने हे इंजेक्शन आणि इतर तत्सम औषधे आजपासून खुल्या बाजारात उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार 11 एप्रिल 2021 पासून रेमडेसिवीर…
-

ती अफवा खोटी | शहरातील सर्व प्रकारची दुकाने आज सुरू राहतील -मनपा प्रशासन
BIG 9 NEWS NETWORK कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेट नुसार राज्य सरकारने निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर हे रद्द करण्यात आलेले आहेत. तर आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीन स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. या मोठ्या निर्णयामुळे 33 जिल्ह्यांमध्ये स्तर (३)चे निर्बंध लागू झालेले आहेत. या ३३ जिल्ह्यामध्ये सोलापूरचा समावेश होतो.…
-

राज्यात कडक निर्बंध लागू ; तिसरी लाट रोखण्यासाठी…
Big9news Network कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन 2005 च्या कायद्याअंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत,कोव्हिड-19 ची साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी विविध आदेशांद्वारे राज्यात निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्र राज्याचा कोव्हिड-19 चा धोका…
-

आरोग्य विभाग देणार मुलांची काळजी घेण्याचे धडे – पालकमंत्री
Big9news Network कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असून मागील आठवड्यापासून “माझे मुल माझी जबाबदारी” आणि “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या दोन अभियाना अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या ठिकाणी सुरू असून आजतागायत 31 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली…
-

अवं.. ‘स्मार्ट’ पाटील हे वागणं बरं नव्ह..! बांधलं बी आणि तोडलं बी…
Big9news Network महेश हणमे /9890440480 सोलापुरातील स्मार्ट सिटीचा डंका संपूर्ण राज्यभर पसरला आहे. खड्डेपूर शहर अशी सर्व सोलापूरकरांना मान खाली घालायला लावणारी ओळख स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यानी निर्माण केली आहे. आज शुक्रवारी दुपारी पद्मा टॉकीज समोरील ‘त्या’ ड्रेनेज,जलवाहिनी जाणारे चेंबर जेसीबीच्या माध्यमातून फोडण्यात आले. कालच सीईओ पाटील यांनी हे काम बरोबरच आहे असे ठासून सांगितले होते.मग,…
-

‘एक पद एक वृक्ष’ या उपक्रमाचा शुभारंभ; पालकमंत्रीनी दिले वृक्ष संवर्धनाचे महत्त्व… पहा
Big9news Network पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड जेवढी महत्त्वाची तेवढेच वृक्ष संवर्धनही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ‘एक पद एक वृक्ष’ या उपक्रमाचा शुभारंभ श्री. भरणे यांच्या हस्ते शासकीय पोल्ट्री फार्म, नेहरूनगर सोलापूर येथे करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद…
-

शहर | आज 774 अहवाल निगेटिव्ह; तर 5 अहवाल पॉझिटिव्ह
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 10 जण बरे झाले परंतु 3 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि.25 जून रोजी कोरोनाचे नवे 5 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 2 स्त्रियांचा समावेश आहे.…
-

दिलासादायक | आज शहरात एकही मृत्यु नाही; तर नवे बाधित रुग्ण ‘या’ परिसरातील
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 11 जण बरे झाले तर एकही मृत्यू नाही. सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.24 जून रोजी कोरोनाचे नवे 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 2 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकूण 933 जणांचे अहवाल…
-

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी
Big9news Network शेखर म्हेञे माढा प्रतिनिधी वटपौर्णिमा हा सण म्हणजे महिलांचा आवडता सण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची मागणी करतात परंतु माढा शहरामध्ये प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने वडाच्या झाडाच्या पूजना बरोबरच शहरातील अनेक भागात वडाच्या झाडाचे रोपण करून वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष तथा प्रियदर्शनी महिला…