Month: June 2021
-

पत्नीस पेट्रोल ओतून पेटवून दिल्याप्रकरणी पोलीस शिपाई बन्ने ..
*पत्नीस पेट्रोल ओतून पेटवून दिल्या प्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय महादेव बन्ने यास जामीन मंजूर* सोलापूर दि:- प्रीती दत्तात्रय बन्ने वय 32,रा:- शुभम कॉम्प्लेक्स, जुळे सोलापूर हिस पेट्रोल ओतून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पेटवल्या प्रकरणी अटकेत असलेला पोलीस शिपाई दत्तात्रय महादेव बन्ने यास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही मोहिते यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत…
-

जागवली नवी आशा | 1 जुलैपासून मानधनात वाढ ; संप घेतला मागे
Big9news Network राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि…
-

शहर | आज बरे झाले 29; तर नवे बाधित रुग्ण 7
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 29 जण बरे झाले परंतु 1 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. सोलापूर शहरात आज रविवारी दि.20 जून रोजी कोरोनाचे नवे 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 6 पुरुष तर 1 स्त्रियांचा समावेश आहे.…
-

आता..बैलासारखे कोरोनाला जुंपू नका,राज्यातील परिचारिकांचे राज्यव्यापी आंदोलन –
Big9news Network महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर ही राज्यातील एकमेव शासनमान्य संघटना असून राज्यातील परिचारिकां संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी संघटनेने मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना काम बंद आंदोलनाचे निवेदन दिले आहे, फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील सर्व परिचारिका कोव्हिड रुग्णांना सातत्याने जिवाची बाजी लावून सेवा देत आहेत.याकाळात इतर सर्व विभागातील कर्मचारी घरी बसून होते, परंतु परिचारिका…
-

सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
Big9news Network छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह…
-

दिलासादायक | आज शहरात एकही मृत्यू नाही; तर नवे बाधित रुग्ण…
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 30 जण बरे झाले तर एकही मृत्यू नाही. सोलापूर शहरात आज शनिवारी दि.19 जून रोजी कोरोनाचे नवे 4 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 1 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकूण 1204 जणांचे अहवाल…
-

मोफत शिवभोजन थाळी योजनेस मुदतवाढ ;वाचा सविस्तर
Big9news Network ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंर्तगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू जनतेसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अन्न व…
-

यंदा…मानांच्या पालख्यांचा लालपरीतून प्रवास
Big9news Network आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ” लालपरी ” धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री…
-

हम से बढकर कौन | पुन्हा पाडले ‘भोक’ ; धनशेट्टी म्हणाले गुन्हा दाखल करू तर पुढारी म्हणताहेत CEO ला काळे फासू.. वाचा पुढे काय घडले..!
BIG 9 NEWS NETWORK स्मार्ट सिटीच्या स्मार्ट अधिकाऱ्यांनी विविध केलेल्या कामाचा डंका संपूर्ण राज्यभर गाजतोय. हार्ट ऑफ सिटी असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर आणि तलाव ही एक पुरातन आणि प्रेक्षणीय वास्तू आहे. या परिसरातील कामाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल पंधरा कोटीहून अधिक खर्च झाल्याची माहिती स्मार्ट अधिकाऱ्यांनी दिलेली होती. मागील पाच ते सहा दिवसापासून तलावात गटारीचे दुर्गंधीयुक्त घाण…
-

म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत दक्ष रहा… – पहा काय म्हणाले पालकमंत्री
Big9news Network जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर ओढवणाऱ्या म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. नियोजन भवन येथे कोरोना रुग्णांच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य…